ताज्या घडामोडी

वसमतच्या हजारो तरुणांची गुरुवारी परभणीकडे भव्य बायकल रॅली; धनगर समाजाच्या महामोर्चाची वसमत विश्रामगृहात जोरदार तयारी

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या हजारो तरुणांची गुरुवारी परभणीकडे भव्य बायकल रॅली; धनगर समाजाच्या महामोर्चाची वसमत विश्रामगृहात जोरदार तयारी

लोकमंच टाईम्स हरनामसिंग चव्हाण

कुरुंदा (प्रतिनिधी):
धनगर समाजाच्या एसटी (ST) आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी येत्या १७ सप्टेंबर रोजी परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्णायक महामोर्चा व महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी वसमत येथील शासकीय विश्रामगृहात भव्य नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत वसमत तालुक्यातून हजारो तरुणांच्या उपस्थितीत परभणीकडे धडकणाऱ्या भव्य मोटरसायकल रॅलीचे नियोजन करण्यात आले.
मल्हार योद्धा दीपकभाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता शनिवार श्री खंडोबा बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी या मार्गावर हा मोर्चा काढला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महामेळावा रंगणार असून “देवाभाऊ पूछता है, धनगर समाज, क्या हुआ तेरा वादा…” या मुख्य घोषणेद्वारे सरकारला २००४ आणि २०१४ मधील आरक्षणाच्या आश्वासनांची आठवण करून दिली जाणार आहे.
जयनगर येथून सकाळी ९ वाजता रॅलीचे प्रस्थान
वसमत तालुक्यातील प्रत्येक गावातून समाजबांधव या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वसमत शहरातील जयनगर येथून गुरुवारी सकाळी ठीक ९.०० वाजता ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीत ही भव्य मोटरसायकल रॅली परभणीच्या दिशेने रवाना होईल.
प्रमुख समाजबांधवांची उपस्थिती
वसमत येथील नियोजन बैठकीला बालासाहेब बाराहाते, लिंबाजी उन्हाळे, विश्वनाथ गवारे, गणपत तागडे, शामराव हिरवे, हिवराचे सरपंच बालाजी होळकर, करंजीचे सरपंच गोरखनाथ मलोडे, बबनराव होळपादे, उमाकांत काळे, संभाजी हिरवे, डॉ. मारुती होह्ले, नवनाथ रवदळे, कुशोबा जमरे, संभाजी मुंजाळ, दिलीप रेणगडे, चंद्रकांत चाहाड, किशनराव डुकरे, विष्णू हिरवे, वामन हिरवे, बाजीराव चोपडे, पत्रकार भगवान कुबडे, बालाजी काळे व शिवाजी गारोडे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाजातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button