“आम्ही दुष्काळाने मरतोय अन् तुम्ही काजू खाताय!” वसमतमध्ये कृषीमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा भडका; ‘त्या’ मिटिंगचा राग बांधावर निघाला! नेसर्गिक दुष्काळाच्या भूमिकेवरून वसमतमध्ये शेतकरी आक्रमक; कृषीमंत्र्यांकडून भरीव मदतीचे आश्वासन, प्रशासकीय लवाजमा हवालदील! “आम्ही दुष्काळाने मरतोय अन् तुम्ही काजू खाताय!” वसमत तालुक्यात कृषीमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकरी आक्रमक; आसेगाव, टाकळगाव अन् बोराळ्यात संतापाचा उद्रेक
हरनामसिंग चव्हाण

“आम्ही दुष्काळाने मरतोय अन् तुम्ही काजू खाताय!” वसमतमध्ये कृषीमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा भडका; ‘त्या’ मिटिंगचा राग बांधावर निघाला!
नेसर्गिक दुष्काळाच्या भूमिकेवरून वसमतमध्ये शेतकरी आक्रमक; कृषीमंत्र्यांकडून भरीव मदतीचे आश्वासन, प्रशासकीय लवाजमा हवालदील!
“आम्ही दुष्काळाने मरतोय अन् तुम्ही काजू खाताय!” वसमत तालुक्यात कृषीमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकरी आक्रमक; आसेगाव, टाकळगाव अन् बोराळ्यात संतापाचा उद्रेक

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (विशेष प्रतिनिधी):
वसमत तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषीमंत्र्यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन पिकांची थेट बांधावर पाहणी केली. मात्र, पाहणी दौऱ्यादरम्यान नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीतील ‘काजू-बदाम’ खाण्याच्या प्रकरणावरून शेतकरी अत्यंत आक्रमक झाले. “आम्ही दुष्काळाने मरत असताना तुम्ही काजू खाऊन शेतकऱ्यांची चेष्टा करता का?” असा थेट आणि तिखट सवाल करत शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांसमोरच आपला संताप व्यक्त केला.
थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी
कृषीमंत्र्यांनी वसमत तालुक्यातील आसेगाव येथे सोयाबीनच्या जळालेल्या व सुकलेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी टाकळगाव व बोराळा येथे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन भीषण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी सुकलेली पिके हातात धरून आपली आपबीती मांडली आणि शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली.
‘काजू-बदाम’ प्रकरणावरून शेतकरी चिडले!
दौऱ्यादरम्यान काही शेतकऱ्यांनी उपरोधिकपणे मंत्री महोदयांना काजू-बदाम खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून काजू-बदाम देण्यात आले होते. याचे फोटो व चित्रे समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. हाच राग मनात ठेवून बांधावर आलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत रोखठोक सवाल केले.
“हा मानवनिर्मित नाही, नैसर्गिक दुष्काळ” — कृषीमंत्री
शेतकऱ्यांचा संताप शांत करताना कृषीमंत्र्यांनी सर्व बाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून भरीव मदत केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच, “हा मानवनिर्मित दुष्काळ नसून नैसर्गिक दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या परिस्थितीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे,” असे आवाहन मंत्र्यांनी यावेळी केले.
‘समृद्धी महामार्ग रद्द करा’ — निवेदनाद्वारे मागणी
या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने कृषीमंत्र्यांना एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आणि मोठी आर्थिक मदत देण्यासोबतच वादग्रस्त ‘समृद्धी महामार्ग’ प्रकल्प रद्द करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली.
प्रशासनाचा मोठा लवाजमा उपस्थित
या वादळी पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक आमदार राजू भय्या नवघरे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्याला वसमत तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

