विवेक गायकवाड यांच्या हस्ते ‘गुरु गौरव पुरस्कार’ प्रदान; वसमतमधील ७६ शिक्षकांचा बहुमान आमदार राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम. पुरस्काराचे तिसरे वर्ष
हरनामसिंग चव्हाण

विवेक गायकवाड यांच्या हस्ते ‘गुरु गौरव पुरस्कार’ प्रदान; वसमतमधील ७६ शिक्षकांचा बहुमान
आमदार राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम. पुरस्काराचे तिसरे वर्ष
लोकमंच टाईम्स:
हरनामसिंग चव्हाण
वसमत:
शिक्षकांच्या बहुमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आमदार राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘गुरु गौरव पुरस्कार’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून, वसमत विधानसभेतील सर्व माध्यमांच्या शाळांमधील ७६ शिक्षक बंधू-भगिनींना यंदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांतील शिक्षकांचा यामध्ये समावेश होता.
या सोहळ्याचे उद्घाटन व पुरस्कार वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमत नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. सुनिता मनमोहन बाहेती होत्या.
आमदार राजू भैय्या नवघरे यांनी आपल्या मनोगतात पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करत, “शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार आहे. गुरुंशिवाय सक्षम समाज घडणे अशक्य आहे, त्यामुळेच या पुरस्काराची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.
प्रमुख उपस्थितांची उपस्थिती
या सोहळ्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, उपसभापती सचिन भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे, सभापती तानाजी बेंडे, विनोद अंभोरे, उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे, गटनेते सचिन दगडू, कन्हैया बाहेती, अविष्कार मनोहरे, जिजामाता हरणे, गौतम वावळे, शेख हरून, सय्यद नयूम, महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे, शहराध्यक्ष आशा देशमुख, विस्तार अधिकारी संगीता जाधव, नमू भाई, मोबिन दा, ॲड. ऋषिकेश शिंदे, गजानन ढोरे, विश्वनाथ फेगडे, संघटना जिल्हाध्यक्ष व्ही. डी. देशमुख, दत्ता पडोळे आणि सचिन गायकवाड यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
हा कार्यक्रम ‘सुरमणी प्रा. कै. दत्ता चौगुले सभागृहात’ पार पडला. सभागृहाची जागा अपुरी पडेल इतकी प्रचंड गर्दी शिक्षक, पालक आणि नागरिकांनी केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केशव खटींग यांनी केले, सूत्रसंचालन श्री. बबन गिनगिने यांनी पार पाडले, तर उपस्थितांचे आभार मदन कदम यांनी मानले.
सोहळा यशस्वी करण्यासाठी मदन कदम, गजानन नवघरे, रामेश्वर ढोणे, उद्धव दाभाडे, गजानन सोळंके, अमोल शर्मा, विठ्ठल कानोडे, शिवदास पोटे, श्रीहरी साबळे, सूर्यकांत देशमुख, सुनील पाटील, नाथराव जाधव, चंद्रकांत अंभोरे, पद्मसिंह जाधव, गजानन इंगोले, महेश बोधने, बालाजी असोले, मारुती गोरे, संदीप शिंदे, भुजंग फुलझळके व नितीन नरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

