ताज्या घडामोडी

पूर्णा सहकारी साखर कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

हरनामसिंग चव्हाण

पूर्णा सहकारी साखर कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

लोकमंच टाईम्स

वसमत:
येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
कारखान्याचे अध्यक्ष मा. श्री. जयप्रकाश दांडेगावकर यांनी सभेपुढे विषयपत्रिकेप्रमाणे सर्व विषय मांडले. उपस्थित सभासदांनी या सर्व विषयांना एकमुखाने मान्यता दिली. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सर्व सभासदांना आवाहन केले की, “सर्वांनी आपला ऊस आपल्याच पूर्णा कारखान्याला देऊन कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे”.
यावेळी वसमत विधानसभेचे आमदार श्री. राजूभैया नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर धरणातून सिंचनासाठी एकूण ०५ पाणी पाळ्या मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार नवघरे यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कारखान्याचे शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले.
या सभेस माजी आमदार पंडितराव देशमुख, वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, ज्येष्ठ सभासद भगवानराव आलेगावकर, प्रा. रामचंद्र बागल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु, कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील, सर्व संचालक, अधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button