वसमतच्या नरहरी गोल्ड कॉम्प्लेक्समध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी मूर्तीपूजन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन; बंगाली कारागीर व सोनार बांधवांची मोठी उपस्थिती
हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या नरहरी गोल्ड कॉम्प्लेक्समध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
मूर्तीपूजन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन; बंगाली कारागीर व सोनार बांधवांची मोठी उपस्थिती
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (विशेष प्रतिनिधी):
येथील नरहरी गोल्ड कॉम्प्लेक्समध्ये बंगाली सोनार कारागिरांचे आराध्य दैवत भगवान श्री विश्वकर्मा बाबा यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसाची सुरुवात धार्मिक विधींनी झाली. सकाळी बंगाली कारागीर अभिजीत दुवा यांच्या हस्ते भगवान श्री विश्वकर्मा बाबांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुलथे यांच्या हस्ते श्रींची भावपूर्ण आरती पार पडली. आरतीनंतर उपस्थित सर्व भाविक, व्यापारी आणि नागरिकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यास प्रकाश कुलथे, आशिष टेहरे, सतीश कुलथे, अक्षत कुलथे, विश्वजीत दुवा, आशिष दोलाई यांच्यासह वसमत शहरातील सराफा व्यापारी, सुवर्णकार बांधव, बंगाली कारागीर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक महाराज, लक्ष्मण खुटिया, विश्वजीत दुवा, आशिष दोलाई, अभिजीत दुवा, सतीश रत्नपारखी, अबु मुशा, पोलास पाज्या, आकाश बर, सुदीप दोलाई, कृष्णा दोरजी, चंदन बिजली, कार्तिक माझी, रिफाज मलिक, सनातन दुवा, प्रसन्न मुंडीक, आकाश बोकन, रोहित दहिवाळ, संतोष टाक, राहुल उदावंत, आदित्य शहाणे, सोनू टाक, वैभव गुरो, गणेश कटकमवार, गणेश आठवले तसेच सर्व बंगाली कारागीर आणि सोनार समाज युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिवसभरात व्यापारी बांधव, सुवर्णकार समाज आणि नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक उत्साह, एकता आणि भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो कॅप्शन:
वसमत : नरहरी गोल्ड कॉम्प्लेक्स येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त भगवान श्री विश्वकर्मा बाबांच्या मूर्तीची आरती करताना सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुलथे. सोबत उपस्थित बंगाली कारागीर, सुवर्णकार समाज बांधव व सोनार समाज युवा मंचाचे कार्यकर्ते.

