ताज्या घडामोडी

वसमतमध्ये प्रथमच लिव्हर फायब्रोस्कॅन आणि एन्डोस्कोपी तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये प्रथमच लिव्हर फायब्रोस्कॅन आणि एन्डोस्कोपी तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत: वसमत शहरात प्रथमच लिव्हर सोनोग्राफी (Liver Fibroscan) आणि पोटाच्या एन्डोस्कोपी तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ‘नवजीवन हॉस्पिटल, वसमत’ येथे पार पडलेल्या या विशेष आरोग्य शिबिराचे उद्घाटन वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरादरम्यान प्रसिद्ध यकृत व पोटविकार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र हरिहर कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांची फायब्रोस्कॅन व एन्डोस्कोपीद्वारे मोफत व अल्प दरात तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र कांगणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईडचे अध्यक्ष संजीव बेंडके यांनी पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांचे स्वागत केले.

वेळेवर निदान हीच आजारावर मात करण्याची गुरुकिल्ली – डॉ. वैभव पडोळे यकृताच्या (लिव्हर) आजारांबद्दल जनजागृती करताना नवजीवन हॉस्पिटलचे डॉ. वैभव पडोळे म्हणाले, “सतत थकवा, कावीळ, मळमळ-उलटी, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, त्वचा काळसर पडणे किंवा पायांवर सूज येणे ही लिव्हरच्या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. मद्यपान करणारे, मधुमेह, फॅटी लिव्हर, हिपॅटायटिस ‘बी’ किंवा ‘सी’चा संसर्ग असणारे आणि अचानक वजन कमी होणाऱ्या व्यक्तींनी वेळेवर यकृताची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.”

या शिबिराच्या प्रसंगी डॉ. देवदत्त दळवी, सचिन भोसले, माजी नगरसेवक योगेश चेपुरवार, राजेश भोसले, कृष्णा पावडे, प्रसाद लालपोतू, सिद्धेश्वर अल्लमखाने यांच्यासह वसमत शहरातील नागरिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वसमत शहरात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फायब्रोस्कॅन आणि एन्डोस्कोपीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याच्या त्रासापासून दिलासा मिळाला असून, या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button