ताज्या घडामोडी

काठोडा तांडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

काठोडा तांडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

लोकमंच टाईम्स हरनामसिंग चव्हाण

वसमत मतदार संघातील
काठोडा तांडा:
येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवनिर्मित संरक्षण भिंतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार राजू भैया नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या संरक्षण भिंतीच्या कामामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.
काठोडा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तब्बल २१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि त्यांना दर्जात्मक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही संरक्षण भिंत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर उपस्थितांनी शाळेच्या इमारतीची तसेच सध्या प्रगतीपथावर असलेल्या ‘डिजिटल इमारत’ कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, यासाठी प्रशासनाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. पाहणी दरम्यान शाळेच्या मैदानावर कबड्डी खेळणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा खेळ पाहून उपस्थितांनी त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व इतर आवश्यक सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावाच्या शैक्षणिक विकासासाठी ही विकासकामांची अखंड वाटचाल अशीच सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button