वसमत येथे रक्षाबंधनाचे औचित्य: आमदार राजुभैय्या नवघरे यांना लाडक्या बहिणींनी बांधली आपुलकीची राखी; स्व. अजितदादांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत येथे रक्षाबंधनाचे औचित्य: आमदार राजुभैय्या नवघरे यांना लाडक्या बहिणींनी बांधली आपुलकीची राखी; स्व. अजितदादांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

वसमत:
रक्ताच्या नात्यापलिकडे जाऊन जपल्या जाणाऱ्या आपुलकीच्या आणि विश्वासाच्या बंधनाचा सण म्हणजेच ‘रक्षाबंधन’. याच पवित्र पर्वानिमित्त आज वसमत येथे आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या संपर्क कार्यालयात राखी पौर्णिमेचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमप्रसंगी सर्वप्रथम स्व. अजितदादांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या आठवणींना भावपूर्ण उजाळा देण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर व ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तालुक्यातील लाडक्या बहिणींनी आमदार राजुभैय्या नवघरे यांना राखी बांधून स्नेहाचा आणि विश्वासाचा हा उत्सव साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन शिंदे, नगराध्यक्षा सुनिता मनमोहन बाहेती, शहराध्यक्षा आशा देशमुख, नगरसेवक उत्कर्षा बाहेती, तालुका सचिव गंगुताई त्रिमले, तालुका उपाध्यक्ष पार्वती वाघमारे, नगरसेवक जयमाला गोरे, ज्योती वाहुळे, रूपाली दगडू, पूजा सोनवणे, मनिषा कदम, दिपाली कदम, भाग्यश्री ताई, अयोध्याताई, प्रतिभाताई शिंदे, धम्मा वाघमारे, नेहा बोबडे, आरती जोंधळे, रत्नमाला एंगडे, शोभा सूर्यातळं, इंदू कुंटवाड यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बहिणींच्या प्रेमाची राखी आणि विश्वासाच्या नात्याची गाठ बांधत सर्व लाडक्या बहिणींनी आमदारांना दीर्घायुष्याच्या आणि उदंड यशाच्या शुभेच्छा दिल्या. वसमत तालुक्यातील प्रत्येक भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा पुनरुच्चार याप्रसंगी करण्यात आला.

