ताज्या घडामोडी

छत्रपती संभाजीनगर येथे तिरंगा रॅलीचा उत्साह; रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसोबत घेतला चहापानाचा आनंद

मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

छत्रपती संभाजीनगर येथे तिरंगा रॅलीचा उत्साह; रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसोबत घेतला चहापानाचा आनंद

छत्रपती संभाजीनगर:लोकमंच टाईम्स

“कार्यकर्त्यांसोबतचे काही निवडक क्षण मनात कायमचे घर करून राहतात. त्यांच्यासोबत घालवलेले आनंदाचे दोन क्षण आणि मनमोकळा संवाद यातून मिळणारे समाधान काही वेगळेच असते,” अशी भावना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीत कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जोश पाहायला मिळाला. रॅलीचा हा उत्साह अनुभवल्यानंतर परतीच्या वाटेवर असताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत अनौपचारिक वातावरणात चहापानाचा आनंद घेतला.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत थेट जमिनीवर बसून संवाद साधला, गप्पा मारल्या आणि मनमोकळेपणाने विचारांची देवाणघेवाण केली.
‘भाजपा हा केवळ पक्ष नसून देशभक्तांचा परिवार’
याप्रसंगी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपा हा केवळ एक राजकीय पक्ष नसून भारतमातेला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशभक्तांचा एक मोठा परिवार आहे. या परिवारातील सहकाऱ्यांशी हितगूज करताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना या नात्याची जिवंत अनुभूती मिळते.”
या अनौपचारिक भेटीदरम्यान पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांच्या या साधेपणामुळे आणि आपुलकीच्या व्यवहारामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हरणामसिंग चव्हाण मो 9921151313

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button