छत्रपती संभाजीनगर येथे तिरंगा रॅलीचा उत्साह; रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसोबत घेतला चहापानाचा आनंद
मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

छत्रपती संभाजीनगर येथे तिरंगा रॅलीचा उत्साह; रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसोबत घेतला चहापानाचा आनंद
छत्रपती संभाजीनगर:लोकमंच टाईम्स
“कार्यकर्त्यांसोबतचे काही निवडक क्षण मनात कायमचे घर करून राहतात. त्यांच्यासोबत घालवलेले आनंदाचे दोन क्षण आणि मनमोकळा संवाद यातून मिळणारे समाधान काही वेगळेच असते,” अशी भावना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीत कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व जोश पाहायला मिळाला. रॅलीचा हा उत्साह अनुभवल्यानंतर परतीच्या वाटेवर असताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत अनौपचारिक वातावरणात चहापानाचा आनंद घेतला.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत थेट जमिनीवर बसून संवाद साधला, गप्पा मारल्या आणि मनमोकळेपणाने विचारांची देवाणघेवाण केली.
‘भाजपा हा केवळ पक्ष नसून देशभक्तांचा परिवार’
याप्रसंगी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपा हा केवळ एक राजकीय पक्ष नसून भारतमातेला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशभक्तांचा एक मोठा परिवार आहे. या परिवारातील सहकाऱ्यांशी हितगूज करताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना या नात्याची जिवंत अनुभूती मिळते.”
या अनौपचारिक भेटीदरम्यान पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांच्या या साधेपणामुळे आणि आपुलकीच्या व्यवहारामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
हरणामसिंग चव्हाण मो 9921151313

