ताज्या घडामोडी

एम. आय. टी. कॉलेज, वसमत येथे विद्यापीठाचा २८ वा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

एम. आय. टी. कॉलेज, वसमत येथे विद्यापीठाचा २८ वा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत (विशेष प्रतिनिधी):
युवक प्रतिष्ठान, वसमत संचलित एम. आय. टी. कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स (बी. सी. ए. व बी. सी. एस.) येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या विद्यापीठ प्रोटोकॉलनुसार २८ वा पदवी प्रमाणपत्र वितरण (Convocation Ceremony) समारंभ अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डेप्युटी रजिस्ट्रार डॉ. रवी सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ शंकरराव कल्याण हे होते. याप्रसंगी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. इंद्रजीत काळे व सचिव सौ. वैशाली काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, विद्यापीठ गीत आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यापीठाच्या नियमानुसार पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची अधिकृत शपथ घेतली.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कु. मीरा शिंदे, अंकीता क्षत्रिय, खुशी वेडे, धनंजय कदम आणि स्नेहा भोसले या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आपल्या शैक्षणिक प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रमुख पाहुणे डॉ. रवी सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पदवी हे केवळ प्रमाणपत्र नसून ती एक मोठी जबाबदारी आणि समाजसेवेची नवी सुरुवात आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन करत आयुष्यात आई-वडिलांची सेवा करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरुनाथ कल्याण यांनी सर्व पदवीधरांचे अभिनंदन केले. प्रामाणिकपणा, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘नॅक’ समन्वय समितीच्या प्रमुख प्रा. नीता जाधव यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधीक्षक Adv. जगन जामगे यांनी मांडले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. अश्विनी टाक यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मनोज कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button