ताज्या घडामोडी

जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी वसमतमध्ये रविकिरण वाघमारे यांचे आमरण उपोषण; प्रकृती खालावली, उपचारास नकार देत आंदोलनावर ठाम!

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी वसमतमध्ये रविकिरण वाघमारे यांचे आमरण उपोषण; प्रकृती खालावली, उपचारास नकार देत आंदोलनावर ठाम!

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत (प्रतिनिधी):
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक रविकिरण वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा ८ वा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक रीतीने खालावली आहे. उपजिल्हा रुग्णालय, वसमत यांनी वैद्यकीय तपासणी करून पोलीस प्रशासनाला त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचे पत्र दिले आहे. परंतु, वाघमारे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास ठाम नकार दिला असून “मागण्या मान्य होईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत उपोषण सुरूच राहील,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे पोलिसांना पत्र
वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत रविकिरण वाघमारे यांच्या मूत्रात ‘कीटोन’ (Ketone) चे प्रमाण मध्यम (Moderate) स्वरूपात आढळले आहे. उपोषणाचे दिवस वाढल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक व गंभीर होण्याची लक्षणे दिसत आहेत. उपोषणकर्त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे आहे. मात्र, वाघमारे यांनी रुग्णालयात भरती होण्यास स्पष्ट नकार दिल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, वसमत पोलीस स्टेशन यांना पत्र लिहून योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची विनंती केली आहे.
“शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष सुरूच राहणार”
आरोग्य प्रशासनाच्या या इशाऱ्यानंतरही रविकिरण वाघमारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही वैद्यकीय उपचार घेणार नाही आणि हा लढा असाच सुरू ठेवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे वसमत परिसरातील मराठा आंदोलकांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता व संतापाचे वातावरण पसरले असून प्रशासनावरील ताण वाढला आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button