ताज्या घडामोडी

पावसाची दडी; वसमतसह हिंगोली जिल्ह्यात शेतकरी संकटात पिके वाळू लागल्याने बळीराजा चिंताग्रस्त; बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

पावसाची दडी; वसमतसह हिंगोली जिल्ह्यात शेतकरी संकटात
पिके वाळू लागल्याने बळीराजा चिंताग्रस्त; बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

वसमत:
वसमत तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळू लागली असून, हाताशी आलेले पीक वाया जाण्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे.
दरवर्षी शेतकरी बांधव बैलपोळा हा सण अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करतात. मात्र, यंदा पावसाअभावी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे पोळ्यासह आगामी सर्वच सण-उत्सव अगदी साधेपणाने साजरे करावे लागतील, असे चित्र दिसून येत आहे. शेतीचे होणारे नुकसान आणि वाढत्या चिंतेमुळे बळीराजाचे मनोबल खचले आहे.
येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास वाळणाऱ्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल आणि शेतकऱ्यांना थोडा धीर मिळेल. सध्या तरी पावसाच्या प्रतिक्षेत असणारा शेतकरी निसर्गाच्या या अवकृपेमुळे मोठ्या संकटाचा सामना करत आहे.
(छाया: नागेश चव्हाण, वसमत)

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button