ताज्या घडामोडी

वसमत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवक ॲड. दीपक कट्टेकर यांचे निवेदन: प्रभाग ११ मधील नागरी समस्या तातडीने सोडवण्याची मागणी

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवक ॲड. दीपक कट्टेकर यांचे निवेदन: प्रभाग ११ मधील नागरी समस्या तातडीने सोडवण्याची मागणी

वसमत ( प्रतिनिधी लोकमंच टाईम्स ):

वसमत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मधील अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्या, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि मुख्य चौकातील धोकादायक खड्ड्यांसंदर्भात नगरसेवक ॲड. दीपक रमेशराव कट्टेकर यांनी वसमत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना ५ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नगरसेवक ॲड. कट्टेकर यांनी निवेदनाद्वारे प्रभागातील खालील प्रमुख समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे:
१. कचऱ्याची समस्या व दंडात्मक कारवाई: माळवटकर यांच्या घराजवळील वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (DP) परिसरात रोज कचरा टाकला जात असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथे नियमित कचरा उचलण्यात यावा आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक / योग्य कारवाई करण्यात यावी.
२. नाल्यांची साफसफाई: प्रभागातील नाल्यांमधील गाळ व कचरा वेळेवर न काढल्यामुळे पावसाळ्यात नाल्यांचे पाणी रस्त्यावर येत आहे. याचा मोठा त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
३. डास प्रतिबंधक फवारणी: साचलेल्या पाण्यामुळे प्रभागात डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी संपूर्ण प्रभागात तातडीने डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी.
४. रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती: प्रभाग ११ मधील मुख्य चौकात पडलेला मोठा खड्डा बुजवण्यासाठी केवळ चुरी टाकण्यात आली होती, जी पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे. हा रस्ता शाळकरी विद्यार्थी, पालक व नागरिकांच्या रोजच्या वर्दळीचा असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या खड्ड्याची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी.
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता नगरपरिषदेने या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी नगरसेवक ॲड. दीपक कट्टेकर यांनी केली आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button