स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हट्ट्यात विविध ठिकाणी आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हट्ट्यात विविध ठिकाणी आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

विशेष प्रतिनिधी लोकमंच टाईम्स:
वसमत तालुक्यातील मौजे हट्टा येथे आज स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध सार्वजनिक व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शुभारंभ कळमनुरी विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या शुभहस्ते झाडे लावून करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन आणि स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत हट्टा येथील जिल्हा परिषद प्रशाला, प्राथमिक आरोग्य केंद्र, केंद्रीय प्राथमिक कन्या विद्यालय, आणि श्री सिद्धेश्वर विद्यालय परिसरात विविध फळझाडे व छायादार वृक्षांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना आमदार राजूभैया नवघरे यांनी सांगितले की, “केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे जतन व संगोपन करणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.”
या वृक्षारोपण कार्यक्रमास किरणराव देशमुख, राजू खाडे, हरिभाऊ शिंदे, दीपक ढगे, सुनील खाडे, शिवा ठाकूर, संजय खाडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा निरोप घेताना लावलेल्या झाडांचे दत्तक रितीने संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
छाया: नागेश चव्हाण, वसमत

