परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बोर्डीकर-गोरेगावकर पर्वाची सुरुवात; अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील यांची बिनविरोध निवड!
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बोर्डीकर-गोरेगावकर पर्वाची सुरुवात; अध्यक्षपदी रामप्रसाद बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील यांची बिनविरोध निवड!

परभणी:
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) अध्यक्षपदी माजी आमदार मा. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी मा. श्री. राजेश (भैय्या) पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आता नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मा. मेघनाताई बोर्डीकर, आमदार मा. राजू भैया नवघरे, आमदार मा. रत्नाकर गुट्टे, आमदार मा. राजेश विटेकर, लक्षमीकांत नवघरे यांच्यासह बँकेचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड जाहीर होताच उपस्थित लोकप्रतिनिधी, संचालक मंडळ आणि कार्यकर्त्यांनी मा. रामप्रसाद बोर्डीकर व मा. राजेश (भैय्या) पाटील गोरेगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले की, “जिल्ह्यातील बळीराजाला आणि सहकार क्षेत्राला बळकटी देणे, बँकेचा कारभार अधिक पारदर्शक करणे आणि तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत बँकेच्या योजना पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असेल.”
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

