वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह!
मुख्य: संपादक हरनामसिंग चव्हाण

वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह!
हिंगोली:
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी सदस्य निवडीसाठी आज, गुरुवार दिनांक ३० जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात ऐतिहासिक मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीचा हा मोठा उत्सव अत्यंत पारदर्शक व उत्साही वातावरणात साजरा होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
मतदानाची वेळ व ठिकाण:
दिनांक: ३० जुलै २०२६ (वार: गुरुवार)
वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत
स्थळ: वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क कार्यालय, रिसाला नाका, देव पॅलेस शेजारी, हिंगोली.
“चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या!”
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मतदानाचे जाहीर आवाहन
माजी जिल्हा समन्वयक तथा सरपंच राहुल गौतम करवंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना, बहुजन चळवळीतील शिपायांना आणि सक्रिय कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अमूल्य मतदान नोंदवण्याचे आग्रहाचे आवाहन केले आहे.
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि लोकशाहीचे मूल्य अधिक दृढ करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने वेळेत पोहोचून मतदानाचा हक्क बजावावा, असा संदेश राहुल करवंदे यांनी दिला आहे.

