ताज्या घडामोडी

आण्णाभाऊ साठे जयंती व कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर वसमत शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत ३1 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक; नागरिकांना उपस्थित राहण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांचे आवाहन

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

आण्णाभाऊ साठे जयंती व कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर वसमत शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत ३1 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक; नागरिकांना उपस्थित राहण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांचे आवाहन

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत:साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने वसमत शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस हिंगोली जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक (SP) प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. आगामी आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव शांततेत, सलोख्याच्या वातावरणात आणि कायद्याचे पालन करून पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना व नियोजन, तसेच नागरिकांच्या सूचना व समस्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
बैठकीचा तपशील:
दिनांक: शुक्रवार , ३1 जुलै २०२६
वेळ: दुपारी ४.०० वाजता
स्थळ: वसमत शहर पोलीस ठाणे
प्रमुख उपस्थिती मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली
पोलीस प्रशासनाचे आवाहन
शहरातील शांतता समिती सदस्य, विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच संबंधित विभागातील अधिकारी यांनी या बैठकीस उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुधीर वाघ यांनी केले आहे.
शहरातील सामाजिक ऐक्य, परस्पर समन्वय आणि शांतता राखण्यासाठी अशा बैठका अत्यंत महत्त्वाच्या असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले सहकार्य द्यावे, असेही पोलीस प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button