ताज्या घडामोडी

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज सादर करण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

मुख्यसंपादक: हरनामसिंग चव्हाण

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज सादर करण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

मुख्यसंपादक: हरनामसिंग चव्हाण

मुंबई:
महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमांतर्गत सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले गणना अर्ज पूर्ण भरून व स्वाक्षरी करून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित बी.एल.ओ. (BLO – मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे, असे प्रसिद्धीपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि टप्पे:
८ ऑगस्ट २०२६: गणना अर्ज भरून बी.एल.ओ. (BLO) कडे जमा करण्याची अंतिम तारीख.
१७ ऑगस्ट २०२६: प्रारुप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
१७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ (दावे व हरकतीचा कालावधी):
नवीन नाव नोंदणी: ज्यांची नावे प्रारुप यादीत नसतील किंवा जे नवीन मतदार आहेत, त्यांनी नमूना ६ (घोषणानपत्रासह) भरून द्यावा.
नोंदीमध्ये दुरुस्ती: नाव किंवा पत्ता दुरुस्तीसाठी नमूना ८ भरावा.
नाव वगळणे / हरकत: यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमूना ७ भरून हरकत घेता येईल.
१९ ऑक्टोबर २०२६ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
⚠️ चुकीची माहिती दिल्यास १ वर्षाची शिक्षा!
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा किंवा विधान केल्यास, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस १ वर्षांपर्यंतची कैद, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
सतत अद्यतन प्रक्रिया (Continuous Updation)
निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२, २३ व २३(३) नुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नाव नोंदणी व सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया आहे. नागरिक कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विहित नमूना क्र. ६ मध्ये अर्ज करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात.
आवाहन: सर्व पात्र नागरिकांनी व मतदारांनी वेळेत आपले अर्ज भरून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button