ताज्या घडामोडी

वसमत येथील स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!

प्रतिनिधी

वसमत येथील स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!

वसमत:
वसमत येथील बँक कॉलनी स्थित स्वामी समर्थ मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरु पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे व पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्री स्वामी समर्थ’ च्या जयघोषाने आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या मंगल प्रसंगी स्वामी समर्थ मंदिरातील सर्व सेवेकरी, भाविक भक्त, तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दर्शनासाठी आणि गुरुपूजनासाठी सकाळपासूनच भाविकांची मंदिरामध्ये मोठी गर्दी दिसून आली. उपस्थित सर्व भाविकांना शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
छाया :नागेश चव्हाण

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button