ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी घेतला पुढाकार; नांदेड शासकीय विश्रामगृहात साधला सविस्तर संवाद

मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी घेतला पुढाकार; नांदेड शासकीय विश्रामगृहात साधला सविस्तर संवाद

नांदेड:लोकमंच टाईम्स
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी हिंगोलीकडे जात असताना नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे विशेष मुक्काम/थांबा घेऊन स्थानिक विद्यार्थी बांधवांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि इतर विविध समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अडचणी, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि इतर दैनंदिन समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. पालकमंत्र्यांनी अत्यंत आपुलकीने सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. तसेच या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आणि त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल उपस्थीत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांचे आभार मानले आहेत.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button