श्री कृष्ण मंदिर वसमत येथे हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेची बैठक संपन्न: नवनिर्वाचित कार्यकारिणीची सर्वानुमते निवड!
मुख्य संपादक:हरनामसिंग चव्हाण

श्री कृष्ण मंदिर वसमत येथे हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेची बैठक संपन्न: नवनिर्वाचित कार्यकारिणीची सर्वानुमते निवड!

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत:
येथील शहर पेठेतील श्री कृष्ण मंदिर येथे हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य महंत श्री खेडकर बाबा महानुभाव यांनी सभेचे अध्यक्ष व मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.
या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते खालीलप्रमाणे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
अध्यक्ष: महंत श्री मोतीबाबा अमृते (बोराळा)
कार्याध्यक्ष: ई.पू. श्री मोहनराजदादा शेवलीकर (रिधोरा)
उपाध्यक्ष: पू. महंत श्री वाघोदेकर बाबा
महामंत्री: महंत श्री दुतोण्डे बाबा (कुरुंदा)
जिल्ह्यातील उपदेशी भक्त मंडळींची मोठी उपस्थिती
या विशेष सभेस महानुभाव पंथातील मान्यवर व माजी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष महंत श्री संतराजबाबा विद्वांस, महंत श्री माधोव्यास बाबा, महंत श्री शिवव्यासबाबा उदरभरे, पू. ई. श्री जीवन कवी भोजने, प्रकाशराव साले, मुंजाजीराव इंगोले, प्रभाकर दळवी, आबासाहेब भालेराव, गंगाधर जाधव, संजय भोसले, दिलीप भोसले आणि गोपाळ भोसले यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेले उपदेशी भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे महानुभाव पंथीय भाविकांकडून व जिल्ह्यातील विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
(छाया : नागेश चव्हाण, वसमत)

