वसमत आमदारांच्या प्रयत्नातून सारोळा-कागबन रस्ता कामाचे भूमिपूजन; मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद
मुख्य संपादक:हरनामसिंग चव्हाण

वसमत आमदारांच्या प्रयत्नातून सारोळा-कागबन रस्ता कामाचे भूमिपूजन; मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
वसमत तालुक्यातील मौजे सारोळा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत आमदार राजू भैया उर्फ चंद्रकांत नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ‘सारोळा ते कागबन’ रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. एकूण ४.१५० कि.मी. लांबीच्या व ५०६.०३ लक्ष रुपये निधीच्या या विकासकामामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री विनायक ऑप्टिकल व राजू भैया मित्र मंडळ सारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दगडूजी विक्रमजी कदम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे हे होते. या प्रसंगी सभापती तानाजी बेंडे, तातेराव कोरडे, त्रिंबक डॉक्टर संतोष कदम, सरपंच संभाजी दुधाटे, उपसरपंच पांडुरंग कदम, शाळा समिती अध्यक्ष बालाजी कदम, बालाजी फेगडे, उत्तमराव दुधाटे, उद्धव कुसळे, सूर्यभान ढवळे, बालाजी पवार, हनुमान ढवळे, सरपंच बालासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर दुधाटे, ज्ञानेश्वर कदम, रामराव कदम, हरिभाऊ कदम, श्रीरंग वाघमारे, दौलत पांचाळ, साहेब पांचाळ, पोलीस पाटील शिवारी फुलारी, साईनाथ दुधाटे, नागनाथ दुधाटे, शिवलिंग चिलवंत, शंकरराव कदम, तुकाराम चव्हाण, प्रभातराव कदम, शिवाजी कदम, मनोहर फुलारी, विठ्ठलराव कदम, पुरभाजी कदम, सखाराम कोरडे यांच्यासह सारोळा व कागबन येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
लोकप्रतिनिधींच्या या धडाकेबाज विकासकामांमुळे व सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामस्थांनी आमदार राजू भैया नवघरे यांचे विशेष आभार मानले.


