ताज्या घडामोडी

वसमतमध्ये गोवंश क्रूरता प्रकरण: कठोर कारवाईसाठी सकल हिंदू समाजाची बैठक; वसमत बंदची हाक!

विशेष प्रतिनिधी

वसमतमध्ये गोवंश क्रूरता प्रकरण: कठोर कारवाईसाठी सकल हिंदू समाजाची बैठक; वसमत बंदची हाक!

वसमत (प्रतिनिधी):
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवला खंदारबन शिवारातील शेतात निर्दयपणे, अन्न-पाण्याविना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १९ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींवर अधिक कठोर कारवाई व्हावी आणि गोवंशाचे संरक्षण व्हावे, यासाठी आज सकल हिंदू समाज, वसमत यांच्या वतीने महत्त्वाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मोंढा मारोती मंदिर येथे पार पडलेल्या या बैठकीत वसमत शहरातील व्यापारी, गोरक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींवर तात्काळ व कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी वसमत बंद ची हाक जाहीर करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या व बैठकीतील निर्णय
कठोर कारवाईची मागणी कत्तलीच्या उद्देशाने गोवंशावर अत्याचार करणाऱ्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
व्यापारी व नागरिकांना आवाहन या घटनेचा निषेध म्हणून आणि गोरक्षणाच्या समर्थनार्थ वसमत बंदच्या दिवशी सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“गौमाता संरक्षणार्थ सर्व गोरक्षक आणि हिंदू समाज एकवटला असून, न्यायासाठी हा बंद पुकारण्यात येत आहे.”
– आयोजक: सकल हिंदू समाज, वसमत

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button