ताज्या घडामोडी

आमदार राजू भैया नवघरे यांच्या सूचनेनंतर प्रभाग ११ मध्ये तातडीने काम; नगरसेवक स्वतः रस्त्यावर!

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

  • आमदार राजू भैया नवघरे यांच्या सूचनेनंतर प्रभाग ११ मध्ये तातडीने काम; नगरसेवक स्वतः रस्त्यावर!

हिंगोली:
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू भैया नवघरे यांनी नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले होते. केवळ आवाहन करून न थांबता, त्यांच्या सूचनेचे पालन करत वसमत येथील प्रभाग क्रमांक ११ मधील लिंबोणी नगर आणि तथागत नगर परिसरात नगरसेवकांनी तात्काळ प्रभागात धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
पावसाच्या पाण्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यात अडथळा (ब्लॉकेज) निर्माण झाला होता, तिथे तातडीने जेसीबी (JCB) यंत्रणा आणि मजुरांच्या मदतीने अडकलेले पाणी बाहेर काढण्यात आले. पाणी साचल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नाल्यांची सफाई करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला.
विशेष म्हणजे,नगरध्यक्ष प्रतिनिधी कनया बाहेती व नगरसेवक धीरज कुलथे स्वतः उपस्थित राहून हे संपूर्ण काम करून घेत होते. लोकप्रतिनिधी स्वतः मदतीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहून लिंबोणी नगर व तथागत नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार नवघरे व नगरसेवकांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button