ताज्या घडामोडी

वसमत मतदारसंघात अतिवृष्टीचा इशारा: आमदार राजू भैया नवघरे यांचे नागरिकांना सतर्कतेचे व काळजी घेण्याचे आवाहन

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत मतदारसंघात अतिवृष्टीचा इशारा: आमदार राजू भैया नवघरे यांचे नागरिकांना सतर्कतेचे व काळजी घेण्याचे आवाहन

वसमत: वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे यांनी मतदारसंघातील सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना व महिलांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या पावसानंतर आता प्रशासनाकडून मुसळधार ते अतिवृष्टीचे संकेत प्राप्त झाले आहेत. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार राजू भैया नवघरे यांनी केलेल्या मुख्य सूचना व आवाहन
नदी व ओढ्याकाठच्या रहिवाशांना इशारा नदी, नाले आणि ओढ्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे.
शेतकरी व महिलांसाठी सूचना शेतात कामासाठी जाणाऱ्या महिला व नागरिकांनी दुपारच्या आधीच सुरक्षितपणे घरी परतावे.
प्रशासन अलर्ट मोडवर तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक तसेच नगरपालिकेच्या सर्व यंत्रणांना तत्पर राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या आणि नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“निसर्गाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी अजिबात न घाबरता योग्य ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,” असे आवाहन आमदार नवघरे यांनी केले आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button