ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणाच्या संघर्षात पहिल्या दिवसापासून वसमतचे आमदार राजूभैय्या नवघरे मैदानात! फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केला ठाम पाठिंबा

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

मराठा आरक्षणाच्या संघर्षात पहिल्या दिवसापासून वसमतचे आमदार राजूभैय्या नवघरे मैदानात! फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केला ठाम पाठिंबा

लोकमंच टाईम्स (हरनामसिंग चव्हाण, वसमत):
मराठा समाजाला हक्काचे आणि शाश्वत आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ऐतिहासिक संघर्षाला वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी पहिल्या दिवसापासूनच आपला ठाम आणि सक्रिय पाठिंबा दिला आहे. २९ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट दिल्यापासून आमदार नवघरे हे मराठा समाजाच्या या लढ्यात सातत्याने खांद्याला खांदा लावून उभे आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार नवघरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर विशेष पोस्ट शेअर करत आंदोलनाला संपूर्ण ताकदीने पाठिंबा दर्शवला आहे. “मराठा समाजाचा लढा हा स्वाभिमानाचा आणि न्याय्य हक्काचा आहे. समाजाच्या भावना, अपेक्षा आणि प्रश्न हे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचे असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सुरुवातीपासूनच कटिबद्ध आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
आमदार नवघरे यांनी आपल्या पोस्टद्वारे शासनाला इशारा व आवाहन करत स्पष्ट केले की, “शासनाने मराठा समाजाच्या सर्व रास्त मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावा.”
२९ ऑगस्ट २०२३ च्या त्या भेटीपासून ते आजपर्यंत आमदार राजूभैय्या नवघरे यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने आपली ठाम भूमिका कायम ठेवली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कृतीतून मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल संपूर्ण वसमत मतदारसंघातून आमदार नवघरे यांच्या भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button