आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या ‘जनता दरबारा’ला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद! शेकडो प्रश्न थेट मार्गी
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या ‘जनता दरबारा’ला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद! शेकडो प्रश्न थेट मार्गी

लोकमंच टाईम्स
वसमत (लोकमंच टाईम्स):
वसमत मतदारसंघाचे धडाडीचे व लोकप्रिय आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या पुढाकाराने आज, ४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबारा’ला नागरिकांचा प्रचंड व तुफान प्रतिसाद मिळाला. कॉलेज रोड येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासूनच जनसागर लोटला होता. आपली दुःखे, प्रशासकीय अडचणी आणि स्थानिक समस्या घेऊन आलेल्या शेकडो नागरिकांच्या आशा-आकांक्षांना आज प्रत्यक्ष न्यायाचा मार्ग मिळाला.
आमदार राजुभैय्या नवघरे यांनी अत्यंत आत्मीयतेने व धैर्याने प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासकीय दिरंगाई, सामाजिक प्रश्न, रस्ते, पाणी, वीज आणि इतर नागरी समस्यांबाबत प्राप्त झालेल्या निवेदनांवर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून कडक सूचना देत अनेक प्रश्न ‘ऑन द स्पॉट’ मार्गी लावले. आमदारांच्या या आक्रमक आणि तत्पर कार्यपद्धतीने नागरिकांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले.
“सामान्य माणसाच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. प्रशासनाकडून कुठलीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा यावेळी आमदार नवघरे यांनी दिला.
वसमत शहर आणि ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो लोकांच्या आशेला आमदार राजुभैय्या नवघरे यांनी दिलेला हा भक्कम प्रतिसाद सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. लोकप्रतिनिधी असावा तर असा, अशीच भावना आज या जनता दरबारातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.

