ताज्या घडामोडी

वसमत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा; निष्पक्ष चौकशीची गटनेते सचिन दगडू यांची मागणी

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा; निष्पक्ष चौकशीची गटनेते सचिन दगडू यांची मागणी

लोकमंच टाईम्स मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत (प्रतिनिधी):
वसमत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. सय्यद इम्रान अली यांनी आपल्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाची दखल घेत, नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक सचिन विठ्ठल दगडू यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
या संदर्भात लोकमंच टाईम्स पत्रकारांशी बोलताना माहिती दिली गटनेते सचिन दगडू यांनी सांगितले की, “आमचा पक्ष आणि आमचे नेते नेहमीच कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवतात. उपनगराध्यक्षांवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय किंवा इतर दबावाशिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ही आमची ठाम भूमिका आहे. सत्य काय आहे ते जनतेसमोर आलेच पाहिजे आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई झाली पाहिजे.”
त्यांनी पुढे नमूद केले की, तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवणे अयोग्य आहे. आमचा देश, न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे.
नगर परिषदेच्या कामकाजाबाबत बोलताना सचिन दगडू यांनी नागरिकांना आश्वस्त केले की, या घडामोडींचा वसमत नगर परिषदेच्या विकासकामांवर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही. नागरिकांचे प्रश्न, शहरातील विकासकामे आणि लोकसेवा यांनाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. कायद्याचा सन्मान करणे, प्रशासनात पारदर्शकता ठेवणे आणि जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button