दारेफळमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ९ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड व लायन्स नेत्र रुग्णालय परभणीचा स्तुत्य उपक्रम
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

दारेफळमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ९ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड व लायन्स नेत्र रुग्णालय परभणीचा स्तुत्य उपक्रम
वसमत (लोकमंच टाईम्स ):
ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी या सामाजिक बांधिलकीतून मौजे दारेफळ (ता. वसमत) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल १५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ९ मोतीबिंदूग्रस्त रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
डॉ. के. सी. पारेख लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स नेत्र रुग्णालय, परभणी आणि लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दारेफळ येथील ज्येष्ठ समाजसेवक राजाभाऊ भालेराव, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच परभणीहून आलेल्या वैद्यकीय पथकाचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
१५६ रुग्णांची तपासणी, ९ जणांना नवे दृष्टीदान
प्रकल्पप्रमुख सी. ए. एकनाथ जगताप यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या शिबिरात एकूण १५६ रुग्णांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने या सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी परभणी येथील लायन्स नेत्र रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकाने ९ रुग्णांवर यशस्वी मोफत शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची योग्य काळजी घेऊन त्यांना लायन्स क्लबच्या वाहनाने सुरक्षितपणे पुन्हा दारेफळ येथे घरपोच सोडण्यात आले. दृष्टी परत मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती
या सेवाभावी उपक्रमासाठी लायन्स नेत्र रुग्णालयाचे लॉ. कुचेरिया सर, लॉ. मुंदडा सर, लॉ. नीरज सर, डॉ. मुळे मॅडम, डॉ. गावंडे मॅडम आणि डॉ. मोरे सर यांनी विशेष योगदान दिले.
तसेच कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष संजीवकुमार बेंडके, माजी अध्यक्ष राजू सिद्दीकी, सचिव कल्याण कुरुंदकर, कोषाध्यक्ष संदीप चव्हाण, प्रकल्पप्रमुख सी. ए. एकनाथ जगताप, राजाराम जगताप, विजय लांडगु, अंबादास मनी, गौस बागवान, इम्रान नूर, प्रसाद लालपोतू, ॲड. अरुण आंबेकर, आलोक जाधव, विक्रम कुंटूरवार, बाळासाहेब बेले, मन्मथ सिद्धेवार, रोहित टेहरे, पिंटू बोखारे, योगेश चेपूरवार, अमित अवसरमल, आशीर्वाद इंगोले व दीपक कट्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भालेराव, पोलीस पाटील गुलाबराव पाटील, गोपीनाथ खरवडे, गणेश वाल्हेकर, प्रवीण अग्रवाल, पोस्टमास्तर भगवानराव भालेराव यांच्यासह दारेफळचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आणि गरजूंना वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड कटिबद्ध असून, भविष्यातही असेच सामाजिक व आरोग्यदायी उपक्रम राबवले जातील, असा विश्वास क्लबच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

