ताज्या घडामोडी

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’ची e-KYC पूर्णपणे मोफत – सहकार आयुक्तांचे कडक आदेश!

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’ची e-KYC पूर्णपणे मोफत – सहकार आयुक्तांचे कडक आदेश!

हिंगोली (विशेष बातमी):

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार e-KYC प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून, कोणत्याही ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा ग्रामस्तरीय उद्योजकाने (VLE) शेतकऱ्यांकडून एक रुपयाही घेऊ नये, असे स्पष्ट व कडक निर्देश सहकार आयुक्त तथा निबंधक (सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांनी दिले आहेत.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात असून, त्यासाठी e-KYC करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेसाठी लागणारे मानधन राज्य शासन थेट VLE च्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून शुल्क आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सहकार आयुक्तांच्या प्रमुख सूचना व निर्देश
सेवा केंद्रांवर फलक अनिवार्य राज्यातील प्रत्येक सेवा केंद्राच्या दर्शनी भागात “e-KYC सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे” असा ठळक फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पैसे मागितल्यास कठोर कारवाई कोणत्याही VLE किंवा सेवा केंद्राने e-KYC साठी पैसे मागितल्याची तक्रार आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रशासनाची करडी नजर जिल्हा व तालुका स्तरावर या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना आवाहन e-KYC ही प्रक्रिया १००% मोफत आहे. कोणत्याही केंद्र चालकाला पैसे देऊ नयेत! जर कोणी शुल्काची मागणी केली, तर तत्काळ संबंधित तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सहकार विभागाकडे तक्रार नोंदवावी.

हा संदेश आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि जागरूक राहा!

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button