ताज्या घडामोडी

नांदेडमधील इंदरजितसिंघ बावरी हत्याकांड प्रकरण: CBI चौकशी व ‘मकोका’च्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; कठोर कारवाईचे आश्वासन

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

नांदेडमधील इंदरजितसिंघ बावरी हत्याकांड प्रकरण: CBI चौकशी व ‘मकोका’च्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; कठोर कारवाईचे आश्वासन

नांदेड / मुंबई:लोकमंच टाईम्स

नांदेड येथील २५ वर्षीय तरुण इंदरजितसिंघ बावरी याच्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’च्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सादर केले.
या प्रकरणी हत्येमागील भू-माफिया आणि संघटित गुन्हेगारांचे षड्यंत्र उघडकीस आणण्यासाठी CBI चौकशीची मागणी करण्यात आली. तसेच आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा देणे आणि नांदेडमधील गँगवार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची ठाम मागणी करण्यात आली.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, निश्चिंत राहा” असे आश्वासन दिले. तसेच सिकलीगर सिख समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असून लवकरच योग्य न्याय दिला जाईल, असा शब्दही त्यांनी दिला.
या भेटी प्रसंगी ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष हरणामसिंग चव्हाण, महाराष्ट्र सिकलीगर सिख समाज संस्था अध्यक्ष तेगा सिंग बावरी व डॉ. बाचूसिंग टाक उपस्थित होते. सदर भेट व मार्गदर्शक श्री रामेश्वरजी नाईक, बाबा हरणामसिंगजी, हॅप्पी सिंगजी, जसपाल सिंगजी संधू आणि सुखविंदर सिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button