दैनिक सकाळचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पंजाब नवघरे यांची ‘व्हॉईस ऑफ MEDIA’च्या हिंगोली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड! पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी काम करणार: पंजाब नवघरे पत्रकारिता क्षेत्र, मित्रपरिवार व लोकप्रतिनिधींकडून अभिनंदनाचा वर्षाव
हरनामसिंग चव्हाण

दैनिक सकाळचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पंजाब नवघरे यांची ‘व्हॉईस ऑफ MEDIA’च्या हिंगोली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड!
पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी काम करणार: पंजाब नवघरे
पत्रकारिता क्षेत्र, मित्रपरिवार व लोकप्रतिनिधींकडून अभिनंदनाचा वर्षाव
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
हिंगोली (विशेष प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (Voice of Media) या नामांकित पत्रकार संघटनेच्या हिंगोली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी ‘दैनिक सकाळ’चे जिल्हा प्रतिनिधी पंजाब नवघरे यांची बिनविरोध व सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंजाब नवघरे हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘दैनिक सकाळ’च्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, तसेच मुख्यत्वे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडण्याचे काम अतिशय निष्ठेने करत आहेत. ग्रामीण भागातील तळागाळातील प्रश्नांवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून सतत प्रकाश झोत टाकणारे अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
पत्रकारितेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, सहकाऱ्यांशी असलेले आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध आणि संघटनात्मक कार्याची विशेष आवड लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वरिष्ठ प्रदेश नेतृत्वाने त्यांच्याकडे हिंगोली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सोपवली आहे.
‘पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणार’
आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंजाब नवघरे म्हणाले,
“बदलत्या काळात पत्रकारांसमोरील आव्हाने प्रचंड वाढली आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट ठेवण्यासाठी पत्रकारांची एकजूट ही काळाची गरज आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक पत्रकाराला संरक्षण, मान-सन्मान आणि त्यांच्या हक्कांचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व ग्रामीण पत्रकारिता अधिक सशक्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.”
–पंजाब नवघरे
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
पंजाब नवघरे यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या हिंगोली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि मित्रपरिवाराने प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या निवडीमुळे हिंगोली ग्रामीण भागातील पत्रकारांमध्ये नवी ऊर्जा व उत्साह निर्माण झाला आहे.

