ताज्या घडामोडी

जवळाबाजार येथील जनता दरबारात आमदार राजूभैया नवघरे यांचा ‘ऑन द स्पॉट’ धडाका! ३० हून अधिक गावांतील नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा; वीज डीपी, पांदन रस्ते आणि पाझर तलावाच्या कामांचे अधिकाऱ्यांना थेट आदेश रुग्णाला वैयक्तिक आर्थिक मदतीचा हात देत आमदारांनी जपली सामाजिक बांधिलकी

हरनामसिंग चव्हाण

जवळाबाजार येथील जनता दरबारात आमदार राजूभैया नवघरे यांचा ‘ऑन द स्पॉट’ धडाका!
३० हून अधिक गावांतील नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा; वीज डीपी, पांदन रस्ते आणि पाझर तलावाच्या कामांचे अधिकाऱ्यांना थेट आदेश
रुग्णाला वैयक्तिक आर्थिक मदतीचा हात देत आमदारांनी जपली सामाजिक बांधिलकी

वसमत / औंढा नागनाथ (लोकमंच टाईम्स हरनामसिंग चव्हाण):
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट जनतेच्या दारी जाणारे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे आमदार राजूभैया नवघरे यांनी आज (दि. २३ नोव्हेंबर) जवळाबाजार (ता. औंढा नागनाथ) येथे भव्य ‘जनता दरबार’ घेऊन परिसरातील ३० हून अधिक गावांतील नागरिकांच्या प्रश्नांचा धडाकेबाज निपटारा केला. केवळ निवेदने स्वीकारून न थांबता, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट फोनवरून संपर्क साधत अनेक प्रलंबित कामे ‘ऑन द स्पॉट’ मार्गी लावल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जवळाबाजार येथे आयोजित या जनता दरबाराला परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरोग्य, महावितरण, पाणीपुरवठा, महसूल, पंचायत समिती तसेच बँकांकडून पीक कर्जासाठी होणारी अडवणूक अशा विविध विषयांवर नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेत आ. नवघरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जनता दरबारातील प्रमुख निर्णय आणि ठळक घडामोडी
रुग्णाला देवदूतासारखी मदत वडद (ता. औंढा) येथील एका गरजू रुग्णाच्या हृदयाच्या व्हॉल्व्हच्या (Valve) शस्त्रक्रियेसाठी आर्थिक अडचण येत असल्याचे समजताच, आ. नवघरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्याकडून वैयक्तिक आर्थिक मदत सुपूर्द करत माणुसकीचे दर्शन घडवले.
वीज प्रश्नावर तात्काळ तोडगा वडद गावात नवीन १०० केव्ही आणि ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र (डीपी) बसविण्याच्या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या. तसेच जवळाबाजार शहरासाठीही नवीन डीपी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
पांदन रस्ते आणि खडीकरणाला गती: शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शेत रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण तसेच ‘हिवरखेड ते केळी’ पांदन रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले.
चोंडी तर्फे शहापूर पाझर तलाव: येथील पाझर तलावाची दुरुस्ती आणि गाळ काढून खोलीकरण करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.
३० हून अधिक गावांचा उत्स्फूर्त सहभाग:
या जनता दरबारास ब्राह्मणगाव, नांदखेडा, पेरजाबाद, नालेगाव, पोटा खुर्द, आसोला तर्फे औंढा, गुंडा, तपोवन, वडद, अनखळी, येळी, हिवरखेडा, चोंडी शहापूर, टाकळगव्हाण, करंजाळा, दौडगाव, उमरा, पुरजळ, नागेशवाडी, कोंडशी, पोटा बु., बेरूळा, जलालपूर, हट्टा, मरसुळ, मरसुळ वाडी, शिरला, कळंबा आणि शिरड शहापूर यांसह परिसरातील शेकडो ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button