ताज्या घडामोडी

हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने ‘फेक’ फेसबुक अकाउंट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाने ‘फेक’ फेसबुक अकाउंट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

हिंगोली:
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (IAS) यांच्या नावाने आणि फोटोचा वापर करून काही अज्ञातांनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बनावट अकाउंटवरून नागरिकांना मेसेज पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून, नागरिकांनी अशा कोणत्याही आवाहनाला किंवा मेसेजला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावाचे हुबेहूब फेसबूक अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकृत फोटो वापरून ते खरे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा बनावट खात्यांमधून नागरिकांना अथवा शासकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मेसेज पाठवणे, आर्थिक मागणी करणे किंवा संशयास्पद लिंक्स पाठवण्याचे प्रकार घडू शकतात.
हा प्रकार निदर्शनास येताच जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली आहे. संबंधित बनावट फेसबुक प्रोफाइलबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने आलेल्या कोणत्याही संशयास्पद मेसेजला उत्तर देऊ नका.
जर कोणाकडून पैशांची मागणी किंवा वैयक्तिक माहिती विचारली जात असेल, तर त्वरित ब्लॉक करा.
अशा प्रकारचा मेसेज आल्यास स्थानिक सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी आणि अफवा किंवा बनावट अकाउंट्सला बळी पडू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button