ताज्या घडामोडी

कळमनुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात 7 हजार 513 विविध योजनांच्या लाभांचे वितरण

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

कळमनुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात
7 हजार 513 विविध योजनांच्या लाभांचे वितरण

हिंगोली दि. 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी येथील केसरीनंदन मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अंदाजे 4 हजार 500 लाभार्थी उपस्थित होते.
या शिबिरास आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भूते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिवंत सातबारा उतारे 1 हजार 151, वाटणीपत्रावरील नोंदणी फीमध्ये सवलत/लाभ 131, पाणंद रस्ते 19, अतिक्रमण नियमानुकूल अर्ज 386, घरकुल लाभार्थी 73, राज्यस्तरीय योजनांचे लाभ 5 हजार 608, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय योजनांचे लाभ 20 आणि बसच्या मोफत पासचे वाटप 125 असे एकूण 7 हजार 513 लाभांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे, नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणे, हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विविध विभागांच्या स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली.
यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव तसेच माजी आमदार गजानन घुगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button