ताज्या घडामोडी

मौजे टाकळगाव व दगडपिपरी येथे आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

मौजे टाकळगाव व दगडपिपरी येथे आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

वसमत तालुक्यातील मौजे टाकळगाव आणि मौजे दगडपिपरी येथे सामाजिक क्रांतीचे जनक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी वसमत विधानसभेचे धडाडीचे व लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मौजे टाकळगाव येथे आयोजित कार्यक्रमात आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन पार पडले. या प्रसंगी गावातील समाजबांधव, महिला भगिनी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच, मौजे दगडपिपरी येथेही जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथेही आमदार राजूभैया नवघरे यांनी ध्वजारोहण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
या प्रसंगी विठ्ठल कोरडे, बालाजी मिरकुटे, बालाजी होळकर, अमोल झुंजुर्डे, ज्ञानेश्वर काळे, काशिनाथ काळे, शिवाजी काळे, सरपंच गजानन मोरे यांच्यासह गावातील समस्त गावकरी मंडळी, समाजबांधव, महिला भगिनी, पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान लोकशाहीरांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
छाया: नागेश चव्हाण, वसमत

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button