ताज्या घडामोडी

वसमतच्या श्री शिवेश्वर महादेव मंदिरात तिसरी महाप्रसाद पंगत भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या श्री शिवेश्वर महादेव मंदिरात तिसरी महाप्रसाद पंगत भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत:
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून वसमत येथील स्टेशन रोडवर स्थित श्री शिवेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलेली महाप्रसादाची तिसरी पंगत अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. दिवसभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात हजारो शिवभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा व सात्विक महाप्रसादाचा लाभ घेतला.
सोहळ्याची सुरुवात सकाळी ६:०० वाजता महाप्रसादाच्या सर्व यजमानांच्या उपस्थितीत भगवान शिवशंभोच्या रुद्र अभिषेकाने झाली. त्यानंतर दुपारी १२:०५ वाजता मंत्रोच्चार आणि हर हर महादेवाच्या गजरात महाआरती संपन्न झाली. महाआरतीनंतर तात्काळ महाप्रसादाच्या वितरणास सुरुवात झाली. दुपारी १२:०५ ते सायंकाळी ४:०० वाजेदरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.
महाप्रसादाचे यजमान:
या धार्मिक सेवाकार्यात श्री. बाळासाहेब महागावकर, श्री. ॲड. दीपकभैय्या मुंदडा, श्री. संभाजीकाका बेले, श्री. आदित्यभैय्या देशपांडे, श्री. दीपकभैय्या जैस्वाल, श्री. अर्जुनकाका सैदांने, श्री. सुनीलशेठ मुगुटकर, श्री. रामदासकाका चेपुरवार, श्री. अश्विनकुमार आंबेकर, श्री. निरजभैय्या जैस्वाल आणि श्री. रामदासभैय्या साखरे या यजमानांचे विशेष योगदान लाभले.
“अन्नदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंदिर सेवेकऱ्यांनी उत्तम नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल श्री शिवेश्वर महादेव मंदिर सेवेकरी (स्टेशन रोड, वसमत) यांच्या वतीने उपस्थित सर्व शिवभक्तांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button