ताज्या घडामोडी

वसमत नगर परिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष इम्रान अली यांचा राजीनामा; नव्या उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग सुरू

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

  • वसमत नगर परिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष इम्रान अली यांचा राजीनामा; नव्या उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग सुरू

(विशेष प्रतिनिधी: प्रवीण वाघमारे ):

वसमत नगर परिषदेच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष इम्रान अली यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा नगराध्यक्षा सौ. सुनीताताई बाहेती यांच्याकडे सुपूर्द केला आहे. उपनगराध्यक्षांनी थेट नगराध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्यामुळे वसमतच्या राजकीय वर्तुळात आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या पक्क्या व खात्रीशीर माहितीनुसार, या राजीनाम्यानंतर वसमतमधील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आता नगराध्यक्ष सौ. सुनीताताई बाहेती या राजीनाम्यावर काय निर्णय घेतात आणि वसमत नगर परिषदेची आगामी सूत्रे कोणाकडे जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? वसमत शहरात जोरदार चर्चा!
इम्रान अली यांच्या राजीनाम्यानंतर आता “वसमतचा नवा उपनगराध्यक्ष कोण?” यावर गल्लीबोळांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
आमदार राजूभैय्या नवघरे यांची भूमिका निर्णायक: आगामी काळातील राजकीय गणितं आणि पक्षाची प्रतिमा लक्षात घेता, आमदार राजूभैय्या नवघरे हे अत्यंत विचारपूर्वकच उपनगराध्यक्षपदाचा निर्णय घेतील, अशी जोरदार चर्चा आहे.
पारदर्शक प्रतिमेच्या उमेदवाराला प्राधान्य: भविष्यात नगर परिषदेच्या कारभारावर किंवा पक्षावर कोणताही आरोप होणार नाही, अशा स्वच्छ प्रतिमेच्या आणि निष्कलंक उमेदवारालाच यंदा प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते.
चाचपणी आणि फिल्डिंगला उधाण: दुसरीकडे, पक्षातील इच्छुकांनी आतापासूनच गुढघ्याला बाशिंग बांधून आपापल्या परीने वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पद आपल्याच गळ्यात पडावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
पद काही दिवस रिक्त राहणार? पक्षांतर्गत योग्य उमेदवाराची चाचपणी पूर्ण होईपर्यंत हे पद काही दिवस रिक्त ठेवले जाणार की तातडीने नव्या चेहऱ्याची घोषणा होणार, याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे.
पक्षातर्फे शेवटी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते आणि ही संधी नेमकी कोणाला मिळते, याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button