स्वातंत्र्यदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण; पोलिसांकडून शानदार मानवंदना!
लोकमंच टाईम्स:हरणामसिंग चव्हाण

स्वातंत्र्यदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयात उत्साहात ध्वजारोहण; पोलिसांकडून शानदार मानवंदना!
लोकमंच टाईम्स:हरणामसिंग चव्हाण

वसमत
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सवी उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणात मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली.
ध्वजारोहणाच्या या मुख्य सोहळ्याप्रसंगी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्यासह महसूल चे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीतानंतर पोलीस दलाच्या सशस्त्र पथकाने राष्ट्रध्वजाला अत्यंत शिस्तबद्ध आणि शानदार मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) दिली. पोलिसांच्या या शिस्तबद्ध संचलनाने आणि मानवंदनेने उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पक्षभेद आणि मतभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र येत भारतमातेच्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला. ध्वजारोहणानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत तालुक्यातील विकासकामे आणि प्रशासकीय सेवेबाबत कटिबद्धता व्यक्त केली.

