कामोठे येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; चरणदीप सिंग (हॅपी सिंग) यांनी वाहिली हुतात्म्यांना आदररांजली
मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

कामोठे येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; चरणदीप सिंग (हॅपी सिंग) यांनी वाहिली हुतात्म्यांना आदररांजली
लोकमंच टाईम्स: हरणामसिंग चव्हाण
कामोठे:
भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची, सुखाची आणि सर्वस्वाची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला व बलिदानाला स्वातंत्र्यदिनानिमित्त कामोठे येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी भाजप नेते चरणदीप सिंग (हॅपी सिंग) यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “आपला तिरंगा सदैव अभिमानाने आणि स्वाभिमानाने फडकत राहो, भारत देश अधिक सामर्थ्यवान, समृद्ध आणि विकसित होवो आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो,” अशी सदिच्छा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. उपस्थितांनी दिलेल्या ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

