वसमत येथील गौतम नगरातील पुरातन विहिरीची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी; दोन दिवसांत स्वच्छता अन् संरक्षक जाळी बसवण्याचे आश्वासन
मुख्य संपादक हरणामसिंग चव्हाण

वसमत येथील गौतम नगरातील पुरातन विहिरीची मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी; दोन दिवसांत स्वच्छता अन् संरक्षक जाळी बसवण्याचे आश्वासन
वसमत (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):
वसमत शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील गौतम नगर भागातील एका पुरातन विहिरीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. हा कचरा लवकरात लवकर साफ करून विहिरीचे पुनर्भरण करण्यात यावे, या मागणीसाठी गौतम नगर येथील नागरिकांनी काल नगर परिषदेला निवेदन दिले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेत आज वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन विहिरीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान, येत्या दोन दिवसांत या विहिरीतील कचऱ्याची संपूर्ण स्वच्छता केली जाईल आणि सुरक्षेच्या दृष्टीने विहिरीवर संरक्षक जाळी बसवून दिली जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले. नगर परिषदेने दाखवलेल्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या पाहणीप्रसंगी विनोद चव्हाण, तथागत गवळी, मुख्तार भाई, विजय ऐगडे, भीमराव नरवाडे, राजरतन वावळे, हसोजी सुर्यवंशी, पवन वाघमारे, निवृत्ती ढेंबरे, विनोद खंदारे यांच्यासह गौतम नगर भागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया / : नागेश चव्हाण,

