ताज्या घडामोडी

हिंगोलीत MCED आणि MITCON मधील अन्यायाविरोधात १५ ऑगस्टला जनआंदोलनाचा इशारा

मुख्य संपादक हरणामसिंग चव्हाण

हिंगोलीत MCED आणि MITCON मधील अन्यायाविरोधात १५ ऑगस्टला जनआंदोलनाचा इशारा

हिंगोली (लोकमंच टाईम्स विशेष बातमी प्रतिनिधी):
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) आणि मिटकॉन (MITCON) प्रशिक्षण केंद्र, हिंगोली येथील प्रशिक्षणार्थी तसेच लाभार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात १५ ऑगस्ट २०२६ रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणतीही चौकशी न झाल्यामुळे त्रस्त होऊन हे पाऊल उचलण्यात येत असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जवाळा बु. (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान लक्ष्मणराव शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आज लेखी निवेदन सादर केले. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी २१ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी (पत्र जा.क्र. २०२६/संकीर्ण कावी-१२२६) जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांना चौकशीचे लेखी आदेश दिले होते.
मात्र, एवढे दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे अन्यायाग्रस्त प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने जनआंदोलन केले जाणार आहे.
मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा
जर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करूनही न्याय मिळाला नाही, तर सर्व अन्यायग्रस्त प्रशिक्षणार्थींना सोबत घेऊन मुंबईतील मंत्रालय येथील मुख्यमंत्री दालनासमोर आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
प्रशासनाला जबाबदार धरले जाईल
निवेदन दिल्यानंतर जर तक्रारदार, त्यांना सहकार्य करणारे समाजसेवक किंवा प्रशिक्षणार्थींना फोनवरून अथवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धमक्या आल्या, जीवितास धोका निर्माण झाला, अपघात झाला किंवा त्यांना खोट्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, तर त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री नरहरी झिरवळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, पोलीस अधीक्षक हिंगोली आणि शहर पोलीस निरीक्षक हिंगोली यांनाही आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button