ताज्या घडामोडी

मौजे टेंभुर्णी येथील डिफेन्स अकॅडमीत तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

मौजे टेंभुर्णी येथील डिफेन्स अकॅडमीत तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण

वसमत प्रतिनिधी :
पर्यावरण संवर्धन आणि हरित वसुंधरेचा संदेश देत वसमत तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथील डिफेन्स अकॅडमीमध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास वसमतचे मा. तहसीलदार सारंग चव्हाण सर आणि नायब तहसीलदार डोणगावकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण पार पडले.
हा उपक्रम टेंभुर्णी महसूल मंडळाच्या वतीने विशेष नियोजन करून राबवण्यात आला. मंडळ अधिकारी प्रियंकाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी महसूल विभागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी विठ्ठल सवंडकर भाऊ यांनी डिफेन्स अकॅडमीच्या आवारात जागा उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले.
वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमास ग्राम महसूल अधिकारी अंकिता जोंधळे, स्वाती तोटावार, अश्विनी घोडके, राहूल कोल्हे, गजानन शिंदे, सोनाली टुले, विश्रांती भोसले तसेच महसूल सेवक अमोल काचगुंडे व मुरली अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डिफेन्स अकॅडमीचे विद्यार्थी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लावलेल्या वृक्षांचे केवळ रोपण न करता त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याचा संकल्प याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी केला. महसूल प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button