ताज्या घडामोडी

म्हातारगाव येथे ‘अंबादास जाधव मित्र परिवारा’तर्फे दिपावली गाव स्नेहभेट आणि फराळ वाटप; सलग दुसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

हरनामसिंग चव्हाण

म्हातारगाव येथे ‘अंबादास जाधव मित्र परिवारा’तर्फे दिपावली गाव स्नेहभेट आणि फराळ वाटप; सलग दुसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

वसमत / म्हातारगाव (प्रतिनिधी):
दिपावलीच्या पावन पर्वावर समाजातील प्रत्येक घटकाचा आनंद द्विगुणित व्हावा, या उदात्त हेतूने आमदार राजुभैया यांच्या मार्गदर्शनाखाली म्हातारगाव येथे ‘अंबादास जाधव मित्र परिवारा’च्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी ‘दिपावली गाव स्नेहभेट व फराळ वाटप’ उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत अंबादास जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गावातील प्रत्येक घरी जाऊन ग्रामस्थांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांनी प्रेमाची भेट म्हणून फराळाचे वाटप केले. केवळ सण साजरा न करता गावातील एकोपा आणि आपुलकी अधिक वृद्धिंगत व्हावी, हा या स्नेहभेटीमागचा मुख्य उद्देश होता.
सलग दुसऱ्या वर्षी राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण म्हातारगावातून आणि पंचक्रोशीतून मोठे कौतुक होत आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाचा वसा जपणाऱ्या या उपक्रमामुळे गावातील दिवाळीचा उत्साह अधिकच वाढला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
या स्नेहभेट व फराळ वाटप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबादास जाधव मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button