वसमत तालुक्यासाठी दिलासादायक बातमी: रब्बी आवर्तनात २ दिवसांची वाढ; प्रत्येक मायनरपर्यंत पोहोचणार पाणी!
हरनामसिंग चव्हाण

वसमत तालुक्यासाठी दिलासादायक बातमी: रब्बी आवर्तनात २ दिवसांची वाढ; प्रत्येक मायनरपर्यंत पोहोचणार पाणी!
वसमतनगर (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):
पुर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सुरू असलेल्या पहिल्या पाण्याच्या आवर्तनात दोन दिवसांची अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक शेतकरापर्यंत, विशेषतः शेवटच्या टोकापर्यंत (टेल एंड) पाणी सुखरूप पोहोचवा आणि प्रत्येक मायनरपर्यंत जलवाहिन्या सक्रिय करा, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून, तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळणार आहे.
पाणी वितरण व्यवस्थेत दिलासादायक निर्णय
यापूर्वी पुर्णा प्रकल्पाचे जुने कालवे ५० ते ६० टक्के क्षमतेने वाहत असल्याने शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रशासनाने याची तातडीने दखल घेत पाणी आवर्तनात २ दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव दिवसामुळे कालव्यांच्या क्षमतेचा प्रश्न सोडवून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणे आता सुलभ होणार आहे.
रब्बी हंगामाचे सुधारित नियोजन:
पहिली पाणीपाळी (वाढीव दोन दिवस राहील
आमदार राजू नवघरे यांचे स्पष्ट निर्देश
“तालुक्यातील एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुर्णा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पाझर व कालव्यांच्या आवर्तनात दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक मायनर आणि शेतकर्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी संबंधित अधिकारी व यंत्रणेला कडक निर्देश देण्यात आले असून, तालुक्यातील प्रत्येक शेतकर्याला यंदा रब्बीचे पाणी मिळेल.”
— आमदार राजू नवघरे
परिणामी, प्रशासनाच्या या नव्या आणि सकारात्मक निर्णयामुळे वसमत तालुक्यातील शेतकर्यांमधील चिंतेचे वातावरण दूर झाले असून, रब्बी हंगामातील पिकांना पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

