
वसमतच्या माळवटा एमआयडीसीत दणका! ११ बायोकोल कारखाने तात्काळ बंद
लोकमंच टाईम्स मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण
हिंगोली, १९ ऑक्टोबर २०२६: पशुकलण्यासाठीचा चारा वाचवण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार आज वसमत तालुक्यातील माळवटा एमआयडीसीमधील तब्बल ११ बायोकोल कारखान्यांना टाळे ठोठावण्यात आले आहेत.
कारवाईमागचे कारण काय?
कारखान्यांमध्ये सोयाबीन व इतर पिकांचे अवशेष (भुसा आणि कडबा) औद्योगिक कामांसाठी वापरले जात असल्याचे तपासात उघड झाले. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
प्रशासनाचे कठोर निर्देश
जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत, तोपर्यंत हे सर्व कारखाने पूर्णपणे बंद राहतील.
पिकांच्या अवशेषांची औद्योगिक वाहतूक करण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाची कारवाई: ही संयुक्त मोहीम वसमतचे तहसीलदार सारंग चव्हाण, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजय मुस्तरे, मंडळ अधिकारी श्री. भद्रे आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

