श्री. अंकुशराव आहेरजी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; हिंगोलीत धुमधडाक्यात सत्कार
हरनामसिंग चव्हाण

श्री. अंकुशराव आहेरजी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; हिंगोलीत धुमधडाक्यात सत्कार
हिंगोली (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या अध्यक्षपदी श्री. अंकुशराव आहेरजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला असून, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. आहेरजी यांच्या बिनविरोध निवडीचे औचित्य साधून ‘ज्ञानेश्वरी’ निवास, नाईक नगर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार श्री. गजाननराव घुघे यांनी श्री. अंकुशराव आहेरजी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार गजानन घुघे म्हणाले, “श्री. अंकुशराव आहेरजी यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या नेतृत्वाचा आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव आहे. त्यांच्या या निवडीमुळे बाजार समित्यांच्या बळकटीकरणाला आणि शेतकर्यांच्या हिताच्या निर्णयांना मोठी गती मिळेल. त्यांच्या भावी कार्यकाळासाठी माझ्याकडून व पक्षाकडून हार्दिक शुभेच्छा!”
या सत्कार प्रसंगी परिसरातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्री. आहेरजी यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

