ताज्या घडामोडी

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश; येलदरी-सिद्धेश्वर धरण कार्यक्षेत्रासाठी ३ पाणी आवर्तनांना मंजुरी! चौथ्या आवर्तनासाठीही जोरदार प्रयत्न सुरू; दुष्काळाच्या सावटात वसमत मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

हरनामसिंग चव्हाण

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश; येलदरी-सिद्धेश्वर धरण कार्यक्षेत्रासाठी ३ पाणी आवर्तनांना मंजुरी!
चौथ्या आवर्तनासाठीही जोरदार प्रयत्न सुरू; दुष्काळाच्या सावटात वसमत मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

लोकमंच टाईम्स मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण:

वसमत
येलदरी व सिद्धेश्वर धरण कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना रब्बी पिकांसाठी संजीवनी देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैय्या नवघरे यांनी केलेल्या आक्रमक व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी पूर्णा प्रकल्पातून तीन पाणी आवर्तने देण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार नवघरे यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बीचे पीक हाताचे जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. हीच बाब गांभीर्याने घेत आमदार राजूभैय्या नवघरे यांनी जलसंपदा विभाग व संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे पाण्यासाठी जोरदार पाठपुरावा लावून धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून तीन आवर्तने मंजूर झाली असली, तरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा मिळावा यासाठी चौथे पाणी आवर्तनही पदरात पाडून घेण्यासाठी आमदार नवघरे यांचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत.
असे असेल पाणी आवर्तनांचे वेळापत्रक:
मंजूर नियोजनानुसार वसमत शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, हट्टा शाखा कालवा आणि अंतिम शाखा कालव्यामधून हे पाणी सोडले जाणार आहे. प्रत्येक आवर्तनाचे नियोजन १२ दिवसांचे असून, संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील:
पहिले आवर्तन : ०१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६
दुसरे आवर्तन : ०१ जानेवारी ते २० जानेवारी २०२७
तिसरे आवर्तन : ०१ मार्च ते २० मार्च २०२७
पाण्याचे व चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन
आवर्तनाचे नियोजन निश्चित झाल्याने धरण कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने व नियोजित पिकांसाठी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासाठी चारा व पाण्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, अशीही विनंती करण्यात आली आहे. “शेतकऱ्यांचे हित हेच माझे सर्वोच्च ध्येय!”

“माझ्या मतदारसंघातील बळीराजा संकटात असताना शांत बसणे शक्य नाही. रब्बी हंगामातील पिकांना वेळेवर पाणी मिळून शेतकऱ्यांचे नुकसान टाळले जावे, यासाठी आम्ही तीन आवर्तने मंजूर करून घेतली आहेत. मात्र, एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून चौथे आवर्तन मिळवून देण्यासाठीही माझा पाठपुरावा शेवटपर्यंत सुरूच राहील.”
— आमदार राजूभैय्या नवघरे, वसमत विधानसभा मतदारसंघ

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button