पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न सभासदांनी आपला ऊस पूर्णा कारखान्यालाच देवून सहकार्य करावे : आमदार चंद्रकांत (राजूभैय्या) नवघरे
हरनामसिंग चव्हाण

पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न
सभासदांनी आपला ऊस पूर्णा कारखान्यालाच देवून सहकार्य करावे : आमदार चंद्रकांत (राजूभैय्या) नवघरे
लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
वसमत (विशेष प्रतिनिधी) :
पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर जि. हिंगोली येथील आगामी २०२६-२७ या गळीत हंगामाचा ४६ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:२१ वाजता अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष मा. श्री. जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
सदर सोहळा कारखान्याचे संचालक मा. श्री. चांदु माणिकराव इंगोले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. ज्योतीताई इंगोले यांच्या शुभहस्ते विधिवत पार पडला. यावेळी वसमत विधानसभेचे आमदार तथा कारखान्याचे संचालक मा. आ. चंद्रकांत (राजूभैय्या) नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धरणातून ४ पाणी पाळी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार : आ. राजूभैय्या नवघरे
मनोगत व्यक्त करताना वसमत विधानसभेचे आमदार राजूभैय्या नवघरे यांनी सांगितले की, “पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर धरणातून एकूण ४ पाणी पाळी शेतीसाठी मिळवून देण्यासाठी शासनाकडे तीव्र पाठपुरावा केला जाईल.” तसेच, भविष्यात कारखान्याला कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच पूर्णा कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ऊस पूर्णा कारखान्यालाच द्यावा : संचालक मंडळाचे आवाहन
शेती व ऊसविकास उपसमिती अध्यक्ष मा. श्री. शहाजीराव देसाई यांनी शेतकऱ्यांनी आपला ऊस पूर्णा कारखान्यालाच देण्याचे आवाहन केले.
संचालक मा. श्री. हरिभाऊ शेळके यांनीही सभासदांना विनंती केली की, सर्वांनी आपला ऊस आपल्या हक्काच्या पूर्णा कारखान्यास देऊन सहकार्य करावे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु, प्रा. रामचंद्र बागल, कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील, सर्व संचालक, परिसरातील सभासद, शेतकरी बंधू, तोड-वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कारखान्याचे कामगार प्रतिनिधी श्री. रघुनाथराव डाखोरे यांनी मानले.

